Builder Sanjay Biyani : बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा झाला उलगडा, ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

0
81
Sanjay Biyani
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Builder Sanjay Biyani) यांच्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर नांदेड पोलिसांना यश आले आहे. या हत्येमध्ये पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. याबाबत आज पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना यश
पाच एप्रिल रोजी संजय बियाणी (Builder Sanjay Biyani) यांची दोन मारेकऱ्यानी त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यामध्ये त्यांच्या चालकावर देखील गोळीबार करण्यात आला. अखेर दोन महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी या हत्येच्या छडा लावण्यात यश आले आहे. खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी ही हत्या केल्याचे समजत आहे. तसेच या हत्याकांडामागे कुख्यात गुंड रिंधाचा संबध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय घडले होते नेमके ?
नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी (Builder Sanjay Biyani) यांच्यावर त्यांच्या घरासमोरच हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. या दोघांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यानच संजय बियाणी यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या चालकावर अजून उपचार सुरू आहेत. याअगोदर संजय बियाणी यांना तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी धमकी दिली होती. त्यानंतर संजय बियाणी यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र हत्येच्या तीन महिन्यांपूर्वीच त्यांची सुरक्षा काढण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

हे पण वाचा :

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा

राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???

आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here