नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमधून एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाने खंडणी (extortion case) मागितल्याप्रकरणी त्याला जेलमध्ये जावं लागलं आहे. त्याने खंडणी (extortion case) मागितल्यामुळे पीडितांनी त्याच्याविरोधात पोलिसात धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर शिवसेनेचा माजी नगरसेवक हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
नांदेडमध्ये खंडणी (extortion case) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर याच प्रकरणात शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार आहे. खरेदी केलेल्या दुकानांचा ताबा देण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी (extortion case) मागितल्या प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाचा मुलगा अक्षय रावत याने शिवसेनेचा माजी नगरसेवक अशोक उमरेकर याच्यासह अन्य दोन जणांविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शिवसेनेचा माजी नगरसेवक अशोक उमरेकर हा फरार आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
खरेदी केलेल्या दुकानांचा ताबा देण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी (extortion case) मागितल्या प्रकरणी अक्षय रावत, राजू बिल्डर, अशोक उमरेकर, गुड्डू आणि इतर 4 ते 5 आरोपींविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दत्तनगर भागात राहणारे सुदाम राऊत यांनी 2 दुकाने खरेदी केली होती. पण या दुकानांचा वाद उपस्थित करून ताबा देण्यासाठी आरोपींनी 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली होती. त्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अक्षय रावतला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अक्षय रावतला याप्रकरणी (extortion case) 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या
आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या
Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!
Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!