हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी “मिशन गंगा” राबविले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावरून भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल संजय राऊतांनी कधी चांगलं म्हटलं आहे का? युक्रेनहून इथे लोकांना आणण्याची ही मोहीम काय शिवसेनेनं सुरू केली का? हा माणूस शुद्धीत असतो का? अशी टीका केली.
नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या विध्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने “मिशन गंगा” राबविले आहे. यासाठी चार मंत्र्यांची नेमणूक केलीये, मला इथे पाठवलं, लक्ष नाय काय म्हणता, या माणसाला टीका करण्याखेरीज काही काम नाही.
रशिया आणि युक्रेनमध्ये भारतीय अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी कार्यक्रम दिला गेला आहे. विमान लँड झाल्यानंतर विमानात जाऊन भेटलो, विद्यार्थी भयभीत झाले असून काही मुली घाबरल्या होत्या. त्यांचं स्वागत केलंय, त्यांचं मनोबल वाढवलंय, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे… पालकही भेटलेयत, बोलणं झालं, काय त्रास झाला सगळे सांगितले. त्यांना देशात पोहोचल्याचं समाधान आहे, असे नारायण राणेंनी त्यावेळी म्हंटले.