जिथं बोलवेल तिथं जाऊन मी संजय राऊतला… ; नारायण राणेंनी राऊतांना दिला थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांना संसदेत सांज राऊत माझ्या बाजूला बसून मातोश्रीबद्दल काय काय सांगतो हे सांगणार आहे. हे ऐकल्यावर उद्धव आणि रश्मी ठाकरे स्वतःच राऊतांना चप्पलेने मारतील. खरं तर शिवसेनेला संपवण्याचे काम मी करत नसून संजय राऊतच खरी शिवसेना संपवतोय. संजय राऊत जिथं बोलावेल तिथं जाऊन त्या ठिकाणी त्याला भेटेन. राऊतसमोर जाऊन उभा राहीन बघुया काय करतो ते,” असे आव्हान भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुंबईत राम कदम यांच्यावतीने आयोजित काशी यात्रेसाठी तब्बल 3 हजार यात्रेकरूंच्या मोफत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री राणे म्हणाले की, शिवसेनेच्या पहिल्या चाळीस वर्षात शिवसेना वाढविण्यासाठी आणि सर्वकाही करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली. संजय राऊतांनी घेतली आहे. शिवसेना संपवण्याचा संजय राऊतांना जो आनंद होत आहे ना तो आपण पाहतोय.आता बाराही आमदार राहिलेले नाहीत शिवसेनेत आणि त्याचा शेवट करायला राऊत तयार आहे.

संजय राऊत कोणाला चॅलेंज देतोयस? एक तरी राऊताचे विधायक, विकासात्मक, धार्मिक कार्य सांगावे. मला रक्त फिरण्याचं चॅकेंज देतो. मी स्वतः प्रोटेक्शन मागितलेली नाही. पोलिसांनी जबरदस्तीने मला १९९० सालापासून प्रोटेक्शन दिले. हे राऊतला माहिती नाही. तेव्हा तो शिवसेनेत नव्हता. माझ्या अंडर 7 कोटी 30 लाख उद्योगपती आहेत. तर संजय राऊताला उद्योग नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला.