Wednesday, February 8, 2023

भाजप आमदार राम कदमांकडून काशीसाठी मोफत ट्रेन; नारायण राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने काशी यात्रेसाठी तब्बल 3 हजार यात्रेकरूंच्या मोफत ट्रेनचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टर्मिनल्समधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर ट्रेन काशीला रवाना झाली.

भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने अनेक समाजउपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. दरम्यान त्यांच्या वतीने आज 3 हजार यात्रेकरूंच्या काशी यात्रेच्या ट्रेनचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता या ट्रेनला मंत्री राणेंच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, आमदार राम कदम यांच्यासह भाजप नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने दरवर्षी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी सर्वात मोठा दहीहंडी उत्सव कदमांकडून आयोजित केला जातो शिवाय या उत्सवात अनेक सिनेअभिनेत्रीही आमंत्रित केले जातात. त्याच्याकडून दरवर्षी अनेक समाजोपयोगी, धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.