नारायण राणेंची उंची त्यांच्या पदापेक्षाही मोठी : संजय राऊत

0
52
sanjay raut narayan rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी भाजपनेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शपथ घेतली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची हि त्यांच्या पदापेक्षाही मोठी आहे. राणे यांनी महाराष्ट्राचे एकेकाळी मुख्यमंत्री पद संभाळलेलं आहे. मंत्रीपदे हि देशाची सेवा करण्यासाठी दिली जातात, असेही राऊत यांनी यावेळी सांगितल.

दिल्लीत बुधवारी पार पडलेल्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत नारायण राणे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. यावेळी राणेंनी शपथविधी घेतल्यानंतर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. याबाबत आज माध्यमांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना विचारणा केली आता त्यांनी मुंबईत हि पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. तर राणेंच्या समर्थकांनी रत्नागिरी, कोकणात जल्लोष साजरा केला. यावेळी नितेश राणे व निलेशराने यांनी काँग्रेसवर टीकाही केली होती. त्यानंतर आता शिवसेनेकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here