नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये, अंबादास दानवे यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र- सध्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये चांगलेच रंगत चालू असल्याचे दिसत आहेत. एकीकडे मुंबईमध्ये दसरा मेळावा कोण आयोजन करणार या गोष्टी चालू असतानाच, दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाचा सडेतोड उत्तर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी दिले आहे. ज्या व्यक्तीला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुख्यमंत्री पद मिळाले आणि ज्यांच्या मुलाला लोकसभेत शिवसेनेनेच पाडले आहे. अशा व्यक्तींनी शिवसेनेला शिकवू नये असे वक्तव्य शिवसेनेच्या मेळाव्यासाठी मनमाडला गेले असता अंबादास दानवे (ambadas danve) यांनी केले.

यावेळी पुढे ते (ambadas danve) म्हणाले, राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किमान राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यांना तातडीची मदत करावी अशी मागणी केली. राज्यात जेव्हा महाविकास आघाडी सरकार होते तेव्हा देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांना बोनस देण्याची मागणी केली होती. आता सत्तेत आल्यावर आपण केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा असाही टोमणा त्यांनी लगावला. काहींना असे वाटते की शिवसेना संपली मात्र याच शिवसेनेला हरवण्यासाठी शिवसेनेतून आमदार फोडले, दिल्लीतून बढ्या नेत्यांना तुम्हाला बोलवावे लागले. एवढेच नाही तर मनसेची देखील साथ तुम्हाला घ्यावी लागली. यावरून शिवसेना संपली नाही तर जिंकल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

येणाऱ्या काळात भगवा फडकवण्यासाठी तयार राहा असे आवाहन देखील या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी (ambadas danve) केले. यावेळी मंचावर संपर्कप्रमुख जयंत दिंडे, उपसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, आ. नरेंद्र दराडे, राजेंद्र देशमुख, संतोष बळीद, संतोष गुप्ता, माधव शेलार, प्रवीण नाईक, प्रमोद पाचोरकर, संजय कटारिया, कैलास गवळी, स्वराज देशमुख आदी उपस्थित होते.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…