संजय राऊत खुश ! कारण शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा आनंद झाला असेल; राणेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही हात असल्याचा आरोप भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांनी नुकतेच एक ट्विट केले असून “संजय राऊत खुश ! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, आज राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने असून आता संजय राऊत खुश असतील. कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल, असे ट्विट राणे यांनी केले आहे.

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत संजय राऊत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “एकनाथ शिंदे यांना वारंवार मुख्यमंत्रीपद देतो असं सांगून त्यांना खर्च करायला लावला, पण कधीही मुख्यमंत्री केले नाही. जेव्हा मुख्यमंत्रीपदाची वेळ आली त्यावेळी आपण स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यातील स्वाभिमान जागा झाला, अशी टीका राणे यांनी केली होती.