ज्यांना जनतेनं नाकारलं तेच आता खोटं बोलत आहेत; CAA कायद्यावरून मोदींचा काँग्रेसवर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । भाजपच्या अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्याचं दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन केले. यावेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी CAA कायद्याबाबत काँग्रेसवर जनतेत अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.

ते म्हणाले कि, ” ज्या विरोधकांना देशातील जनतेनं नाकारलं आहे. आता ते खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत. लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. सक्रिय राहण्याची गरज आहे. नाकारलेले लोक अफवा पसरवत आहेत. असा आरोप मोदींनी काँग्रेसवर यावेळी केला.

मोदी पुढे म्हणाले, लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. सक्रिय राहण्याची गरज आहे. नाकारलेले लोक अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आता राहिला नाही. ते खोटं बोलत राहतील आणि आपण पुढे जात राहू. ही जनताच आमची खरी शक्ती आहे. याच शक्तीनं पहिल्यांदाच एखाद्या बिगर काँग्रेस पक्षाला बहुमत दिलं आणि त्यानंतर दुसऱ्यांदा मोठ्या बहुमतानं निवडून दिलं. निवडणुकांमध्ये जनतेनं ज्यांना नाकारलं, त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्रे उरली आहेत. त्यात खोटं बोलणं आणि अफवा पसरवणं ही दोन शस्त्रे आहेत. हे आतापर्यंत बघत आलो आहोत. असा विश्वास मोदींनी यावेळी उपस्थित पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा- 

साईबाबा जन्मस्थानाचा शोध मुंबईकराने लावला; वाचा स्पेशल रिपोर्ट

संपूर्ण भारतात कमळ फुलवणार; नवनिर्वाचित भाजप अध्यक्षांचा निर्धार

गर्दीत अडकलेले केजरीवाल उमेदवारी अर्ज न भरताच परतले 

 

Leave a Comment