“हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।” ; मोदींच्या गोंधळावरून काँग्रेसचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणा दरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाडानंतर गोंधळून गेले त्यानंतर त्यांनी काहीसा संतापही व्यक्त केला. मोदींच्याबाबतीत या घडलेल्या प्रकारानंतर काँग्रेसकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. “हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।” असे काँग्रेसने ट्विट केले असून “एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही सहन झालं नाही,” असे राहुल गांधी यांनी म्हणत मोदींना टोला लगावलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणामुळे चर्चेत आले आहेत. या प्रकरणावरुन काँग्रेसनेही ट्विट करीत पंतप्रधानांच्या बाबतीत घडलेल्या या प्रकारची खिल्ली उडवली आहे. हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था। टेलिप्रॉम्प्टर माणूस: अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना, असे ट्विट करीत काँग्रेसने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन खिल्ली उडवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. यावेळी मोदी भाषण देत असताना अचानक टेलीप्रॉम्प्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो बंद झाला.

यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. पंतप्रधान मोदी गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. या घडलेल्या प्रकारानंतर मोदींवर काँग्रेसकडून निशाणा साधला जात आहे.