मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Shivaji Maharaj And NArendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Modi is compared to Chhatrapati Shivaji Maharaj | आज 20 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या (Ram Mnadir) उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती राहीली होती. यावेळी त्यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठेची विधी करण्यात आली. मात्र दुसऱ्या बाजूला गोविंद देवगिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तुलना छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबरोबर केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या भव्य सोळल्यावेळी गोविंद देवगिरी महाराज काय म्हणाले जाणून घेऊया.

अयोध्येत पार पडत असलेल्या कार्यक्रमात बोलताना गोविंद देवगिरी महाराज म्हणाले की, “मला आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींची आठवण येतेय. त्यांनी महाराजांच निश्चयाचा महामेरु अस वर्णन केलं होतं. आज आपल्याला असाच श्रीमंत योगी मिळालाय आहे. आज अंतकरण, उल्हास, समाधान आणि कृतज्ञतेने भरलेलं आहे. ही केवळ एका मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही. ही या देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वासच प्रतीक आहे. आज 500 वर्षानंतर ते शक्य झालं आहे”

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत, “देशातील राजकीय वातावरण असे आहे की, कोणी कसलही उद्घटन करुन जातो, त्यासाठी काय सिद्धी प्राप्त करावी लागणार, याचा विचार करत नाही. मोदींना तीन दिवस उपवास करायला सांगितलेला, तुम्ही 11 दिवस उपवास केला, उपवास सर्वात मोठा तप आहे असं महाभारतात म्हणले आहे. असा तपस्वी राष्ट्रीय नेता मिळण ही सन्मानाची बाब आहे. तुम्ही 11 दिवस कडाक्याच्या थंडीत जमिनीवर झोपलात, ही मोठी गोष्ट आहे” असे देखील गोविंद देवगिरी महाराज म्हणाले.

पुढे बोलताना, “मला या परंपरेला बघून एका राजाची आठवण येत आहे. त्या राजामध्ये हे सर्व गुण होते, त्या राजाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराज एकदा मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी शैलमला गेले होते. तीन दिवस त्यांनी उपवास केला. तीन दिवस ते शिव मंदिरात राहिले. महाराज म्हणाले, मला राज्य करायच नाहीय, मला सन्यास घ्यायचा आहे. इतिहासातील हा विलक्षण प्रसंग आहे, मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलोय, मला परत नेऊ नका, त्यावेळी महाराजांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं. आज असाच महापुरुष आपल्याला मिळालाय” असे म्हणत त्यांनी मोदींच्या उपवासाचा संदर्भ शिवाजी महाराजांची जोडला. आज त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळेच राज्यांमध्ये सुवर्णप्रसंगी नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.