“ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता..”; ‘द काश्मीर फाईल्स’विषयी पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट दि. 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठे विधान केले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट हा खूप चांगला असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत. अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हे देखील समजते. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत, असे मोदी यांनी म्हंटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठकी पार पडली. यावेळी मोदी म्हणाले की, “द काश्मीर फाईल्स हा खूप चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहावा. असे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हेदेखील समजतं. कोणी शोषण केलं किंवा कोणी चांगलं काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न यांसारखे चित्रपट करतात”, अशा शब्दांत मोदींनी कौतुक केलं. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 मार्च रोजी, दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी आणि चित्रपटाचे निर्माते अभिषेक यांच्यासह चित्रपटाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी त्यांचे अभिनंदन करत चित्रपटाचे कौतुक केले होते.

Leave a Comment