नवी दिल्ली |नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नव्या अध्यायाची मोदी शपथ कधी घेणार हा सर्वांना पडलेला प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३० मे रोजी पद आणि गोफणीयतेची शपथ देणार आहेत अशी माहिती राष्ट्रपतीभवनाच्या वतीने काढण्यात
आलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
Narendra Modi to take oath as PM on 30th May at 7pm, at Rashtrapati Bhavan. Members of Union Council of Ministers to also take oath. pic.twitter.com/qC2kTE35fE
— ANI (@ANI) May 26, 2019
भाजपने एकट्याने ३०३ जागा जिंकून आपला गतवेळीचा विक्रम मोडला आहे. भाजपच्या या दैदिप्यमान याशाबरोबरच भाजप आणि एनडीएने एकत्रित ३५३ हा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजप आपला शपथ विधी सोहळा दिव्य करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश केला जाणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात असून भाजपला सर्वच राज्याचा समतोल मंत्रिमंडळात साधावा लागणार आहे.