1 फेब्रुवारीला माथाडी कामगार करणार एक दिवसीय लाक्षणिक संप : नरेंद्र पाटील

0
109
Narendra Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री सुरेश खाडे यांना वेळोवेळी माथाडी कामगारांच्या प्रश्नी निवेदने दिली. माथाडी चळवळीत 50 वर्षांचा जुना कायदा हा वेळोवेळी बदलने गरजेचे होते. ते झालेले नाही. माथाडी कामगाराच्या मुलांना माथाडी बोर्डात प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी माथाडी कामगार 1 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप करणार आहेत, अशी माहिती माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.

नरेंद्र पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत माथाडी कामगारांच्या संपाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अनेकवेळा सरकारला निवेदने दिली आहेत. नुकतीच मुख्यमंत्री शिंदेंचीही भेट घेतली तसेच त्यांनाही संपाबाबत निवेदन दिले आहे. माथाडी कामगारांचे अधिकारी हे माथाडी मंडळस्वतःच्या बापाची जहागिरी समजत आहेत. त्यांच्याकडून कामगारांना न्याय देण्यात दिरंगाई केली जात आहे.

 

काही ठिकाणी तर माथाडी कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे कामही झाले आहे. अशा अनेक प्रश्नासंदर्भात आम्ही वेळोवेळी माहीत मंत्र्यांना दिलेली आहे. परंतु आजही आम्हाला तारीख पे तारीख मिळत आहे. म्हणून आता आम्ही 1 फेब्रुवारी रोजी संप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले.