उदयनराजेंकडून पराभूत झालेले नरेंद्र पाटील मोतोश्रीवर

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | उदयनराजे भोसले यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे नरेंद्र पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी नरेंद्र पाटील मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या लढतीबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मोकळ्या मनाने कौतुक केल्याचे देखील बोलले जाते आहे.

कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का?

सातारा मतदारसंघातून नरेंद्र पाटील यांनी भरगोस मतदान घेवून राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांना जंग जंग पछाडले. या लढतीत त्यांनी जनतेला दाखवून दिले कि उदयनराजे अजिंक्य नेते नाहीत. यांना देखील कोणी तरी पराभूत करू शकतो.

रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका

सातारा मतदारसंघात आम्ही राष्ट्रवादीला चांगली लढत दिली मात्र आमच्या काही चुका झाल्या त्यामुळे आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. मात्र आम्ही पराभवाने खचून जाणार नाही. अधिकच लढत राहणार आहे. त्याच प्रमाणे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांचे लोकसभा निवडणुकीतील निकालाबद्दल अभिनंदन केले आहे असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.