दुर्दैवी ! सीईटीचा क्लास संपवून घरी येताना झालेल्या अपघातात 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील संगमनेर या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये शनिवारी दुपारी सीईटीचा क्लास संपवून घरी येत असताना तरुणीच्या दुचाकीचा अपघात (Accident) झाला. या अपघातात (Accident) एकीचा मृत्यू झाला आहेत तर इतर दोघीजणी जखमी झाल्या आहेत.

काय घडले नेमके ?
नांदूर शिंगोटे तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास इथल्या तीन तरुण विद्यार्थींनी सीईटी क्लासला गेल्या होत्या. क्लास संपवून घरी येत असताना त्यांची दुचाकी एका उभ्या ट्रकला धडकली आणि हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामध्ये एकीचा जागीच मृत्यू झाला तर बाकी दोघीजणी जखमी झाल्या. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थिनींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.

साक्षी अनिल खैरनार असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे तर सविता सूर्यभान सांगळे आणि वर्षा जगपात असे या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तरुण विद्यार्थींनीच्या अपघाती (Accident) मृत्यूमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

‘वर्दी उतार के आओ, तुम को देख लेता’

शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी

चंद्रपूरमध्ये विचित्र अपघात ! घटना CCTVमध्ये कैद