नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये मानवी वस्तीत बिबट्या घुसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये बिबट्याने नाशिकच्या एका गावात पाळीव कुत्र्यावर हल्ला (Nashik Leopard Attack) केला आहे. एका घराच्या अंगणामध्ये हा कुत्रा राखण करत होता. त्या वेळी कुणी तरी येतंय, याचा सुगावा त्या कुत्र्याला लागला. यानंतर कुत्रा बिबट्यापासून बचाव करण्यासाठी सैरावैरा पळू लागला. पण बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली (Nashik Leopard Attack) आणि त्याला जबड्यात पकडून बिबट्या पसार झाला. ही थरारक घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
#WATCH | Leopard entered a residential area in Mungsare village of Nashik, attacked a pet dog yesterday
(Source: CCTV) pic.twitter.com/OznDoeQvHR
— ANI (@ANI) June 6, 2022
नेमकी कुठं घडली घटना?
नाशिक जिल्ह्यातील मुंगसरे गावात ही थरारक घटना घडली आहे. यावेळी घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हि घटना कैद झाली आहे. रविवारी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि एक कुत्रा अंगणात बसला आहे.हा पाळलेला कुत्रा असून त्याच्या गळ्यात एक पट्टाही दिसतो.
यानंतर कुणीतरी येत असल्याची जाणीव होताच कुत्रा सतर्क होतो. उठून उभा राहतो. बिबट्या असल्याचं लक्षात येताच, कुत्रा आपला बचाव करण्यासाठी सैरावैरा धावतो. मात्र बिबट्या त्या कुत्र्यावर झडप (Nashik Leopard Attack) घालतो आणि त्याला जबड्यात पकडून निघून जातो. नाशिकच्या अनेक गावांत बिबट्याची दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळेस बिबट्याचे हल्ले वाढले असून लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर
रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी
दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू
अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर
वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान