नाशिकमध्ये आयशर ट्रकचा भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मालेगाव : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये (nashik) ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आयशर ट्रक पलटी झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 30 हून अधिक ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात नाशिकच्या (nashik) नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी शिवारात काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

नेमकं काय घडलं?
भिमाशंकर येथील कारखान्यावरुन ऊस तोडणीचे काम करून हे कामगार आपल्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात आयशर ट्रक पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 30 हून अधिक ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या वाहनातून जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर तातडीने नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

हे पण वाचा :
नवनीत राणांवर टीका करताना अजितदादांचा नेम पडळकरांवर; म्हणाले की, 1 पट्ट्या….

शरद पवारांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ

नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लौंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अखेर अटक

WhatsApp आणणार 3 दमदार फीचर्स; Movies सुद्धा शेअर करता येणार

Leave a Comment