Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) चढ- उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 3 आठवड्यातील घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज 9 मे 2022 रोजीमल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 7 रुपयांनी किरकोळ वाढून 51,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

तर दुसरीकडे, चांदीच्या दरातही आज तेजी दिसून येत आहे. MCX वर आज चांदीचा भाव 52 रुपयांनी वाढून 62,600 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 62,450 रुपयांपासून सुरू होता, परंतु मागणी आणि खरेदी वाढल्याने लवकरच त्याची किंमत 0.08 टक्क्यांनी वाढून 62,600 वर पोहोचली.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : (Gold Price Today)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,890 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,810 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,890 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने (Gold Price Today) बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

हे पण वाचा :

Whatsapp Features : व्हॉट्सअॅप आणणार 3 दमदार फीचर्स; Movies सुद्धा शेअर करता येणार

आर्थिक नियोजनासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होईल भरपूर फायदा

PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!! कर्जावरील व्याजदरात वाढ

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

महागाईचा दणका!! साबण, शाम्पूसह ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागल्या

Leave a Comment