नवनीत राणांवर टीका करताना अजितदादांचा नेम पडळकरांवर; म्हणाले की, 1 पट्ट्या….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची आव्हान दिल्यनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या नावावर सरकार बनवून दाखवलं आणि तुम्ही काय त्यांच्या गप्पा मारता असं म्हणत अजितदादांनी नवनीत राणा याना फटकारले. तसेच यावेळी नवनीत राणा यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नेम धरला. ते साताऱ्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या नावावर सरकार आणलं आणि तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहायच्या काय गप्पा हाणता?? त्यांचे सुपुत्र पाऊण लाख मताने निवडून आले आहेत असं अजित पवार म्हणाले. असाच एक पट्ट्या निवडणूक लढवण्यासाठी बारामती ला आला होता. मी तेव्हा काही बोललो नाही. पण बारामतीकरांनीच त्याचे डिपॉझिट जप्त करून त्याला घरी पाठवले.असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर याना टोला लगावला.

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. राज ठाकरे यांचं जेवढं वय नाही तेवढं शरद पवारांनी राजकारण केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी भोंगे बंद केल्याचं कौतुक राज ठाकरे करत आहेत. मात्र त्यांनी फक्त मशिदींवरचे नाही तर मंदिरांवरचे भोंगेही उतरवले आहेत हे लक्षात घ्या असं अजित पवार म्हणाले