नवी दिल्ली । बिहार या राज्यात कितीही दारूबंदी असली तरी देखील येथील पुरूष गोवा आणि महाराष्ट्रापेक्षा तुलनेने अधिक दारू पितात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० च्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे. दारू रिचवण्यात तेलंगणही गोव्याच्या पुढेच आहे. तर, सर्वाधिक तंबाखू सेवनात ईशान्येकडील राज्ये आघाडीवर आहेत.
दारु पिण्यामध्ये सिक्कीमच्या महिला टॉपवर
ईशान्याकडील सिक्कीम या राज्यातील महिला देशात सर्वाधिक दारू पितात. सिक्कीमच्या १६.२ टक्के महिला दारू पितात. तर आसामच्या ७.३ टक्के महिला दारू पितात. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेलंगणचे पुरुष दारु पिण्यात टॉपला आहेत, तर तेथील महिला देखील फार मागे नाहीत. या सूचीत त्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वेक्षणानुसार, गोवा आणि तेलंगणला वगळले तर सर्वात जास्त दारूचे सेवन ईशान्येकडील महिला पितात.
काश्मीर, गुजरातचे पुरुष सर्वात कमी पितात दारू
सर्वेक्षणानुसार, दारू पिण्यात महाराष्ट्राचे पुरुष देशात तिसऱ्या स्थानी आहेत. तर, कर्नाटकचे पुरुष सर्वात जास्त दारू पितात. जेथे दारूबंदी आहे अशा गुजरात आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये पुरुष सर्वात कमी दारू पितात. तथापि, गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत यंदा दारू पिणाऱ्यांच्या संख्येत किती फरक पडला आहे यााबबत माहिती मिळू शकलेली नाही. सन २०१५-१६ च्या सर्वेक्षणात १५ ते ४९ वर्षीय लोकांचा सर्वे करण्यात आला होता. तर नव्या सर्वेक्षणात १५ वर्षांच्या वरील सर्वच लोकांचा समावेश करण्यात आला आहे.
दारुपेक्षा तंबाखूचे सेवन अधिक
देशात सर्व राज्यांमध्ये दारूच्या तुलनेत तंबाखूचे सेवक सर्वाधिक केले जाते. तंबाखू सेवनामुळे कर्करोग होत असल्याच्या मोठ्या जाहिराती होत असतानाही लोकांना तंबाखूचे मोठे व्यसन असल्याचे स्पष्ट होत आहे. दारुपेक्षा तंबाखू खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’