राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर
शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले.