नगरपंचायत निवडणूकीत भाजपला जनतेने नाकारलं; नवाब मलिकांचा हल्लाबोल

Malik Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सर्व जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला. नगरपंचायत निवडणुकीत 80 टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असून याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारल आहे असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

नवाब मलिक म्हणाले, राज्यातील जनतेचा कल महाविकास आघाडी कडे दिसत आहेत. काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र लढले तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तरीही मतांचे विभाजन झालं नाही आणि महाविकास आघाडीला भरगोस यश मिळाले अस नवाब मलिक यांनी म्हंटल.

यावेळी नवाब मलिक यांनी रोहित पाटील, रोहित पवार यांचेही विशेष अभिनंदन केले. राष्ट्रवादीतील नवीन नेते रोहित पवार, सुनील शेळके, रोहित पाटील यांनी दोन तीन वर्ष आपल्या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे अस मलिक यांनी म्हंटल.