हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली. राष्ट्रवादीने महत्वाचे खाते स्वतःकडे ठेवले आणि मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे दिले, अशी टीका पाटील यांनी केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. “राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जुळत असल्याने ते भाजपला पचत नाही. त्यामुळे भाजपचे लोक आशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.
नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सांगत आहेत की सत्तेचा दुरुपयोग करून निवडणूक लढवण्यात आली. म्हणजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. फडणवीस यांच्या आरोपांना कोणतेही तथ्य नाही. सध्याच्या नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आता भाजप नेते काहीच बोलत नाहीत.
निवडणुकीचे जे निकाल लागले आहेत. कोणता पक्ष एक नंबरवर आहे आणि कोणता पक्ष दोन नंबरवर आहे हे महत्वाचे नाही. लोकांच्या पक्षाच्या पाठबळामुळे हे निकाल येत आहेत. आमचे आणि शिवसेनेचे जमत असल्यामुळे हे भाजपला पचत नाही. उलट त्यांनीच शिवसेनेचे खच्चीकरण केले आहे. अमित शहा ज्या प्रकारे अबकी बार तीनसो के पार असे आकडे फेकत आहेत. आकडे फेकणे हे आमचे काम नाही. आकड्यांचा धंदा हा भाजपचा आहे, हे सोमय्यांना कळले पाहिजे, असा टोलाही यावेळी मलिक यांनी लगावला.