हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे त्याच्याकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली जाते. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. “राणेंनी पैसा आणि ताकदीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकली. गल्लीत निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्ड कप जिंकला असं होत नाही,” अशी टीका मलिक यांनी राणेंवर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नारायण राणे हे एक केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी देशपातळीवरील निवडणुकीत लक्ष घालायला हवे. ते सोडून ते जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालत आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात 24 जागांची जबाबदारी घ्यावी आणि त्या ठिकाणी भाजपच्या जागा निवडून आणाव्यात, मग आम्हाला कळेल की ते केंद्रीय मंत्री आहेत.
गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत दिले नव्हते. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे गोव्यात भाजपची सत्ता आली. त्यावेळी देखील जे राजकारण घडले तेच आता पुन्हा एकदा गोव्यात होत आहे. महाविकास आघडी प्रमाणे गोवा विकास आघाडी करावी,अशी आमची भूमिका असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.