हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीच्यावतीने चौकशीसाठी नेण्यात आले. दरम्यान आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यानंतर मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे,” असे मलिक यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर आज पहाटे ईडीने कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर त्याची चौकशी सुरु असताना त्यांनी ट्विट करीत “झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे”,अशी प्रतिक्रिया दिली होती. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना दुपारी अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आले.
ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संवाद साधता आला नाही. अखेर त्यांनी दोनच शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.