एनसीबीने ड्रग पार्टी प्रकरणात सोडलेल्यांमध्ये एक राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा; फडणवीसांचा गौप्यस्फोट

devendra fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ वरील ड्रग पार्टी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या लोकांपैकी काहींना सोडून देण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून देण्यात आले. असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या व्यक्ती चे नाव मी घेणार नाही. मात्र तो क्लीन होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर देखील निशाणा साधला. एनसीबीचे खच्चीकरण करण्यात येत आहे का ? असे विचारताच त्यांनी नवाब मलिक यांचे दुखणे वेगळे आहे. त्याविषयी मी याआधीही बोललेलो आहे, असे खोचक वक्तव्य फडणवीसांनी केले.