ज्याच्या बुद्धीला जे पटलं ते बोलले; अजितदादांचा राणेंना खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार अस भाकीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता महाविकास आघाडी कडून राणेंवर पलटवार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंवर निशाणा साधला. ज्याच्या बुद्धीला जे पटत ते तो बोलत असतो अस म्हणत त्यांनी नारायण राणे यांना खोचक टोला लगावला.

पवार यावेळी म्हणाले, ज्या दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. तेव्हापासून सरकार पडणार असं बोललं जात आहे. पण चाललंय ना बाबा सरकार. कोण कोण काय बोलतयं ते तुम्ही कोट करून ठेवता,’ अशा मिश्किल शब्दात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवाय यावेळी त्यांनी सरकारला काहीचं धोका नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले-

राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही असं राणे म्हणाले