Tuesday, January 31, 2023

अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच; लॉकडाऊन गोंधळावर अजित पवारांची प्रतिक्रिया

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकसंबंधी घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. या गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलं. ‘अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असतं,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. संवाद साधतात तसेच आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून राजेश टोपे हे काही बाबी स्पष्ट करत असतात. विजय वडेट्टीवार हे देखील माध्यमांशी बोलत असतात. कालही ते बोलले. मात्र, बैठकीतील चर्चेची माहिती देताना एक शब्द त्यांच्याकडून राहून गेला होता. त्यातून गैरसमज पसरले गेले,’ असं अजित पवार म्हणाले. ‘सरकार कोणाचंही असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील तो अंतिम निर्णय असतो, असेही अजित पवार यांनी म्हंटल.

- Advertisement -

विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण –

राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाउन काढण्याचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिलं होतं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.