अजित पवारांचे राज ठाकरेंवर वादग्रस्त विधान ; म्हणून राज ठाकरे बोलायाचे बंद झाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानावर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघते. अजित पवार यांना सत्य हे त्यांच्या अनोख्या ढंगात बोलण्याची सवय आहे. त्यांच्या अशा विशेष शैलीतच त्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला आहे. भाजपचे सरकार पैशावर आणि ईडीच्या भीतीवर राजकीय नेत्यांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे आधी किती बोलत होते मात्र ईडीची चौकशी झाल्या पासून ते बोलायचेच बंद झाले असे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार बोलण्याच्या ओघात सत्य बोलून गेले असून त्यांनी राज ठाकरे यांच्या बदललेल्या राजकीय हालचालीवर अचूक बोट ठेवले आहे. कोहिनुर मिलच्या वादग्रस्त जागे संदर्भात राज ठाकरे यांची ईडीने सलग आठ तास चौकशी केली होती. त्या चौकशीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारापुढे येऊन माझ्या बोलण्यात काहीच फरक पडणार नाही असे म्हणले होते. मात्र त्यांनी त्यानंतर अदयाप काहीच सरकार विरोधी विधान केले नाही. म्हणून अजित पवार आता त्यांच्यावर बोलून गेले आहेत.

अजित पवार यांनी भाजपमध्ये निघालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर देखील तोंडसुख घेतले आहे. तीन पिढ्या सत्तेत आणि काँग्रेसमध्ये गेलेले लोक आता भाजपमध्ये निघाले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या बाबत आम्ही कोणताच विश्वासघात केला नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय तुम्हाला मानवा लागेल असे मी त्यांना म्हणालो होतो. त्यांना मी ५० ते ५५ फोन कॉल केले मात्र त्यांनी उचलला नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.