शेलारांना गरळ ओकायची सवय; अजितदादांचा कडक शब्दांत पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसला घोटाळेबाज, काँग्रेसला झोलबाज आणि शिवसेनेला दगाबाज म्हंटल होत. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेलारांवर कडक शब्दांत निशाणा साधला आहे.

अजित पवार म्हणाले, आज सरकार त्यांचं नाही ही आशिष शेलार यांनी खंत आहे. त्यांचं दुखणं इतकं मोठं आहे की त्यावर दुसरं काहीही न करता अशीच गरळ ओकायची त्यांना सवय लागली आहे. मी कधीही त्या गोष्टीला महत्त्व देत नाही”, असं अजित पवार म्हणाले.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले-

महाविकासआघाडी सरकारमध्ये सुरू असलेले वाद पाहाता राज्यात कधीही निवडणुका लागू शकतील, असं भाकित आशिष शेलार यांनी केलं होतं. हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत. शिवसेना दगाबाज आहे. मोदी आणि फडणवीसांच्या नावानं मतं मागितली आणि दगाबाजी केली. दगाबाजीने का असेना मुख्यमंत्री झाले. असा टोला शेलार यांनी लगावला.

You might also like