हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार समाचार घेत त्यांची खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘ते’ वक्तव्य झोपेत केलं की जागं असताना असा सवाल अजित पवारांनी केला. ते शनिवारी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राज्यात ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं आहे. तेव्हापासून भाजप नेत्यांच्या पोटात दुखत आहे. आपण सरकारमध्ये नाहीत, हे त्यांना सतत बोचत आहे. अशात कार्यकर्त्यांनी सोबत राहावं, यासाठी ते काही ना काही बोलत राहतात. त्यामुळे जोपर्यंत महाविकास आघाडी सरकारातील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत हे सरकार टिकणार, असंही पवार यावेळी म्हणाले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते –
महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपूर्वी सत्तेत आल्यापासूनच महाविकास आघाडी सरकारची स्थिती कुठल्याही क्षणी सरकार पडेल अशी आहे. त्याचदिवशी त्यांनी बॅगा भरून ठेवल्या आहेत. कोविडचा प्रकोप म्हणा किंवा त्याचं नशीब यामुळे हे सरकार 18 महिने टिकलं आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.