हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रकरणाला फडणवीसाना जबाबदार धरले आहे.किशोर वाघ यांच्यावर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. याची आठवण अमोल मिटकरी यांनी करून दिली.
आ.चित्राताई,श्री किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपात गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता.
आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात.त्यामुळे दिशाभूल करू नये. pic.twitter.com/0JuGDXjGBN— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 27, 2021
अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. किशोर वाघ यांच्यावर यापूर्वी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याहीपेक्षा सन 2016 रोजी भाजपनेच याबाबत खुली चौकशी लावलेली आहे, असा खुलासा अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे केला. तसेच चित्रा वाघ यांनी भाजपत प्रवेश केला नसता तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असता, असा दावाही त्यांनी केला
तसेच तुम्ही भाजपमध्ये गेल्या नसता तर देवेंद्र फडणवीस यांनीच किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता, तुम्ही शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्या आहात. तुम्ही लोकांची दिशाभूल करु नका,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांच्यावर मिटकरी यांनी टीका केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’