मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी ट्वीट करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी अनेकदा जाहीर सभेत कौतुक केले असून शशिकांत शिंदे हे पवारांचे निकटवर्तीयपैकी एक मानले जातात. राष्ट्रवादीकडून या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे.
श्री. शशिकांत शिंदे, सातारा व श्री. अमोल मिटकरी, अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे.@shindespeaks @amolmitkari22
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 10, 2020
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल (९ मे) ट्वीट करत राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती दिली. तर भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे नावे ४ मे रोजी निश्चित झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.