Sunday, April 2, 2023

भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीकडून केला जातो. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून भाजपला इशारा दिला आहे. भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हंटल

केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम करत आहे. सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, भाजप यंत्रणांच्या बळावर सरकार बनवू शकत नाही, असं सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान , ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर जो बोलतो त्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. मात्र कितीही त्रास दिला तरी ओबीसींच्या प्रश्नांसाठी बोलतच राहणार असे भुजबळांनी सांगितलं. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे. सरकार पडण्याची भीती नाही, असा दावाही त्यांनी केला.