हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खासदारांना दिल्लीत जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. संसदेचं अधिवेशन सुरु आहे मात्र, करोनाच्या संकटाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना जेथे असतील तेथेच थांबण्याचा सल्ला पवारांनी दिला आहे. तसेच सरकारी यंत्रणांना मदत करण्याचे आदेश पवारांनी खासदारांना दिले.
कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी खासदारांना आपआपल्या भागांत जातीनं लक्ष घालत लोकांना मदत करायला सांगितलं आहे. त्याचबरोबर खासदारांनी स्वतःला सुद्धा कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचवावं असा सल्ला सुद्धा शरद पवार यांनी त्यांना दिला आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.