हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका घेऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबईत आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका नको ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं. तसंच येत्या 15 दिवसांत महामंडळाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिलीय.
राज्यात पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी सर्वच ठिकाणी शिवसेना, काँग्रेसबरोबर आघाडी होईल असे नाही, काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी दोन किंवा तीन पक्षांची आघाडी करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.