बीड प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात बीड मधील पाच विधानसभांसाठी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे उमेदवारी देताना तरुण चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. उमेदवारी जाहीर झालेल्यांमध्ये अनुक्रमे बीड मधून संदीप क्षिरसागर, गेवराई मधून विजयसिंह पंडित, केज मधून नमिता मुंदडा, परळी मधून धनंजय मुंडे, तर माजलगाव मधून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना संधी देण्यात आली आहे. तसेच बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात पवारांनी बीड राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्यांवर सडकून टिका केली.
तर भाजपा सरकारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात काम केलेच नाही तर मत मागण्याचा अधिकार त्यांना अधिकार आहे का? पाच वर्षात प्रत्येक गोष्टीला ज्यांनी अपयश आणले त्यांच्यात हातात सरकार द्यायचे नाही असे आवाहन त्यांनी केले. ज्या ठिकाणी मुख्यंमत्री राहतात त्या नागपूर शहरात सगळ्यात जास्त गुन्हेगारी आहे.आज नागपूर शहराची क्राईम सिटी म्हणून ओळख झाली आहे असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.