परमबीर सिंग यांच्या संपत्तीत कशी वाढ झाली याची देखील चौकशी करावी ; राष्ट्रवादीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब मुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी सारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील परमबीर सिंग यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. परमबीर सिंग यांच्या संपत्तीची देखील चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

एखादा अधिकारी पायउतार झाल्यानंतर किंवा बदली झाल्यावर काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला अवाहन देण्याचा प्रयत्न देत असतो. तेव्हा तो अधिकारी महाराष्ट्र सरकारल्या अधिकाराला अवाहन दिल्यागत होत आहे. दिल्लीला गेल्यावर काही लोकांना बळ येतय हे सुध्दा आम्हांला माहिती आहे. मुंबईचे कमिशनर झाल्यानंतर काही लोकांच्या संपत्तीत वाढ झाली असेल. पोलिस खात्यात आल्यावर संपत्तीत वाढ झाली त्यांची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, या अधिकाऱ्यांना ताकद कोण देतय, शक्ती देतय हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. खरोखर हे अधिकारी चागलं काम करतायत असं चित्र रंगवलं जातय. ज्यां अधिकाऱ्यांच्यावरच टीका केली, तेच पाठिशी घालत असतील, ते सरकारला अवाहन देण्याच धाडस करत असतील. तर माझी मागणी अशी आहे, की या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. संपत्तीची चौकशी राज्य सरकारच्या माध्यमातून करून त्यांची संपत्ती जनतेला सांगावी. असे अधिकारी महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे काम करत होते, हे सत्य राज्यातील जनतेला कळूद्या.

अनिल वाझे याच्या बाबत जो काही प्रकार झाला असेल, त्या संबधातून किंवा मुंबईचे कमिशनर झाल्यानंतर त्या काही लोकांच्या संपत्तीत वाढ झाली असेल. पोलिस खात्यात आल्यावर संपत्तीत वाढ झाली असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिेजे. जनतेला या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा तपशील कळला पाहिजे.

सुप्रीम कोर्टात बदलीला अवाहन देण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा एखादा अधिकारी चुकीच्या पध्दतीने काम करत असेल. तसेच जबाबदार अधिकारी कामात कुचराई करत असेल म्हणून त्याची बदली केल्यास तो अधिकारी अवाहन देत असल्यास राज्य सरकारने चौकशी करणे गरजेचे असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment