देहूरोड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी,
शरद पवारांनी नातवाच्या आग्रहासाठी साठी पार्थ पवार यांना मावळची लोकसभेची उमेदवारी दिली असून मावळ मतदार संघ हा चॉकलेट मतदारसंघ झाला केवळ थट्टा-मस्करी करण्याच राजकारण चालले आहे अशी परिस्थिती सध्या झालेली आहे मावळ मतदार संघात सुरू आहे. मावळ मतदार संघ हा चॅलेंज मतदारसंघ असून या मतदारसंघा चे चॅलेंज राजकीय पार्ट्यांना नसून ते चॅलेंज मतदारांना असल्याचे मत बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले
रेव्ह पार्टी करणार यांच्या हाती मावळ लोकसभेची सत्ता देणार आहात का?बाळासाहेब आंबेडकर यांचं मतदारांना सवालनातवाचे लाड पुरवण्यासाठी मावळ मतदार संघ चॉकलेट म्हणून दिला गेलेला आहे रेव्ह पार्ट्या करणाऱ्यांच्या हाती सत्ता दिली तर तरुणांना चांगलं मार्गदर्शन करण्याऐवजी त्यांना व्यसनाधीन करणार आहात का असा सवाल मावळातील मतदारांना बाळासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथील सभेत केला
पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय मावळ मतदारसंघात ठाण मांडून आहे भर उन्हात पवार कुटुंबियांना प्रचारासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. वंचित बहुजन आघाडीमुळे घरात बसून फर्मान सोडणार यांना आता रस्त्यावर उतरून गावोगावी फिरून प्रचार करावा लागत असल्याची टीका पवार कुटुंबीयांवर प्रकाश आंबेडकर यांनी केली
प्रकाश आंबेडकर यांनी मानले सुषमा स्वराज यांचे जाहीर आभार
बालाकोट मध्ये सेनेकडून हवाई हल्ला करण्यात आला परंतु या हल्ल्यामध्ये कोणीच मारलं गेलं नाही परंतु कुठल्याही प्रकारची माहिती न घेता उतावळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे आतंकवादी मारल्याचे सांगितलं तर अमित शहा यांनी अडीचशे आतंकवाद्यांचा खात्मा केल्याच्या सांगितलं परंतु सुषमा स्वराज यांनी हवाई हल्ल्य करण्यात आला मात्र यात कोणीही आतंकवादी मारले गेले नाही या खऱ्या वक्तव्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी सुषमा स्वराज यांचे जाहीर आभार मानले
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
बँकेत नोकरी करायची आहे ! मग हि संधी सोडू नका
राहुल गांधीच्या उमेदवारीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला अंतिम निर्णय
Breaking | कोल्हापूर अर्बन बँकेला या तंत्राचा वापर करून ६७ लाखांचा गंडा
भाजपच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ ; धमकी दिल्याचा गुन्हा दाखल