पडळकरांचं वय किती, पवारसाहेबांचा अनुभव किती ; जयंत पाटलांचा शेलक्या शब्दांत हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवार भ्रष्टाचारी असून अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पवारांचे हात लागता कामा नयेत असे पडळकर म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते पडळकर यांच्यावर तुटून पडले होते. दरम्यान आज मंत्री जयंत पाटील यांनी देखील गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला.पडळकरांचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती, अशा शेलक्या शब्दात जयंत पाटील यांनी पडळकरांवर हल्ला चढवला.

सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेलं आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फस्ट्रेशन आले आहे हे यातून स्पष्ट होते, असंही ते म्हणाले.

पडळकरांचं बोलणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही. ते नेहमी बेताल वक्तव्य करत असतात. पडळकरांचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती, अशा शेलक्या शब्दात जयंत पाटील यांनी पडळकरांवर हल्ला चढवला. सत्ता मिळविण्यासाठी एन-केन मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like