“सौ चुहे खाके बिल्ली हज को चली”; जयंत पाटलांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला आणि खास करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट करून भाजपच्या आंदोलनाची एकाप्रकारे खिल्ली उडवली आहे. ‘राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असंच काहीस आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.

जयंत पाटलांचा रोख फडणवीसांकडे –

दरम्यान या ट्विट मध्ये जयंत पाटील यांचा रोख पूर्णपणे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं स्पष्ट दिसत आहे कारण
विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाजपनं तिकीट कापलं होतं.