फडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? – जयंत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपुरात केला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत ते बोलत होते

भाजप प्रचार करताना सांगतंय की, आम्हाला भारत नानांबद्दल आदर आहे. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे?’, असा सवाल करतानाच ‘पंढरपूर मंगळवेढा येथील जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील’, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस नक्की काय म्हणाले होते –

एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

You might also like