हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींवर माझा काही फार विश्वास नाही, कारण आरक्षणासाठी जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय मांडला आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे
जितेंद्र आव्हाड म्हणाले खरं तर माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही. मंडळ आयोगाचे आरक्षण हे ओबीसी साठी होत मात्र आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नसत .
ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात शांततेचं वातावरण असताना धर्मा धर्मा मध्ये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला तसेच आव्हाडांनी राज्यातील जनतेची माफी मागावी असेही अशी मागणी त्यांनी केली