हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईंकाना देण्यात आलेल्या घरांचे स्थान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कमीलीचे नाराज झाले आहेत. त्यातच सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे तर्क- वितर्काना उधाण आले आहे. दरम्यान ही भेट नेमकी कशासाठी झाली याबाबत स्पष्टता अद्याप समोर आली नसली तरी महाविकास आघाडी मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसत आहे.
सोमवारी दुपारी शिवडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी लालबाग परिसरात कॅन्सरग्रस्तांना वितरित करण्यात आलेल्या १०० गाळ्यांच्या विरोधात उसळलेल्या जनक्षोभाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदार चौधरींच्या त्याच पत्रावर शेरा मारत गाळे वितरणाला स्थगितीचे आदेश आपल्या प्रधान सचिवांना लगोलग देऊन टाकले होते.
मुख्यमंत्र्यांनी जय चौधरी यांना महत्व दिल्यामुळे जितेंद्र आव्हाड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आव्हाडांची नाराजी ओळखून मुख्यमंत्र्यांनीही लगेच पर्यायी जागा दिली. पत्राचाळीचा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांची नाराजी दूर करण्याचा पर्यत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे काहीच नसल्याचं दाखवत असले तरिही आव्हाडांनी नाराजीमुळे फडणवीसांची भेट घेतली.