कालीचरण महाराजांसारख्या विषारी प्रवृत्तीला ठेचून काढा; जितेंद्र आव्हाड संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. कालीचरण महाराजांच्या गांधींवरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. या विषारी प्रवृत्तीला अटक करून ठेचून काढा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हंटल की, हा कलीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे. कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि या ऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करतो अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा.हा सनातनी आहे. निवडणुकीला उभा राहिला 247 मत्त मिळाली

कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले-

छत्तीगडची येथील धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे