सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – आज राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Gram Panchayat Elections) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडले. यात सरासरी 74 टक्के मतदान झाले. आता या निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीकडे (Gram Panchayat Elections) संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पंढरपूर तालुक्यातील आजोती ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व गट राष्ट्रवादीचा निवडून येण्यासाठी अमरजीत पवार हे आग्रही होते. त्यानुसार त्यांनी ग्रामपंचातीमध्ये विजय (Gram Panchayat Elections) मिळवला. या विजयानंतर अमरजित पवार यांच्या केसाची व दाढीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली. गेल्या तीन वर्षापासून सरपंच पद राष्ट्रवादीचे झाल्याशिवाय आपण केस आणि दाढी काढणार नाही. असा पण, पवार यांनी केला होता.
यानुसार आज अमरजीत पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेमधून सरपंच झाल्यावर त्यांनी हा आपला पण, तिरुपती बालाजी येथे जाऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मतदारांचे पुष्पा स्टाईलने आपल्या केसावरून आणि दाढीवरून हात फिरवत मतदारांना (Gram Panchayat Elections) अभिवादन करत आभार मानले.
राज्यातील निवडणुकांचे निकाल
34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटने आतापर्यंत 780 जागांचा निकाल समोर आला आहे. यामध्ये भाजपने 203 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदे गटाने 129 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना 85 आणि काँग्रेस 78 गटावर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शिंदे गटाला भारी पडली आहे. राष्ट्रवादीने 135 जागांवर आघाडीवर आहे. संपूर्ण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Elections) भाजप आणि शिंदे गट आघाडीवर आहे.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या