हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 15 व दिवस आहे. राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याकडून नाराजी नाट्य करण्यात आले. त्यांच्या या नाराजीनाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. “आझाद मैदानात धिंगाणा घालणाऱ्या “जय विरु” पैकी जयला खांद्यावर उचलून राडा करणारे हे जयचेच कार्यकर्ते असावेत. यावेळी “आमच्या वर विश्वास नाही का” असे बोलुन जय ने स्वतःचेच हसु करून घेतले, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आझाद मैदानात धिंगाणा घालणाऱ्या “जय विरु” पैकी जयला खांद्यावर उचलून राडा करणारे हे जयचेच कार्यकर्ते असावेत . आज ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेल हे लक्षात येताच “आमच्या वर विश्वास नाही का” असे बोलुन जय ने स्वतःचेच हसु करून घेतले,” असे म्हणत मिटकरींनी खोत व पडळकरांवर निशाणा साधला आहे.
आझाद मैदानात धिंगाणा घालणाऱ्या "जय विरु" पैकी जयला खांद्यावर उचलून राडा करणारे हे जयचेच कार्यकर्ते असावेत . आज ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेल हे लक्षात येताच "आमच्या वर विश्वास नाही का" असे बोलुन जय ने स्वतःचेच हसु करून घेतले 😄
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 24, 2021
गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात एसटीचे प्रवासी अधिक आहेत. अशातच एसटी बंद असल्यामुळं प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, आता एसटीचे थांबलेले चाक पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि संपकरी यांच्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पहिल्यांदाच दोन्हीकडून चर्चेसाठी पुढचं पाऊल टाकण्यात आलं आहे.