संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; अजित पवारांचा राणेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तीन दिवसांच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजप नेते व आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी राणेंना टोला लगावला असून संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही. खासदार, आमदार होणे सोपे पण बँकेची निवडणूक लढवणे अवघड आहे, असे पवारांनी म्हंटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाजप नेते नारायण राणे यांना टोला लगावला. यावेळी पवार म्हणाले की, सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये. बँक ही प्रत्येक जिल्ह्याची आर्थिक नाडी असते. ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे असून येथे स्पर्धा मोठी असल्याचे पवारांनी म्हंटले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन केंद्रीयमंत्री नानारीन राणे यांना टोला लगावला आहे. त्यामुले उपमुख्यमंत्री पवारांच्या टोलेबाजीला राणेंकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पहावे लागणार आहे.

Leave a Comment