हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझवर छापा टाकल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोप साईलने केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी वानखेडे यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना टोला लगावला.
मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “जे लोक इतरांना जेलमध्ये टाकत होते. त्यांच्या मागे कोर्ट कचेऱ्या लागणार आहे. मलिक हे जी लढाई लढत आहेत. त्यामध्ये मालिकांच्या मागे पक्ष खंबीरपणे पाठीशी आहे. काही अधिकारी हे चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत आणि जनतेला त्रास देत आहेत. हे सध्या जनतेला कळू लागले आहे.
केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा आहेत. त्या भाजप विरोधी तपास यंत्रणा ज्या ज्या ठिकाणी आहे. त्या त्या ठिकाणी त्या अतिरेक करताहेत. त्यामुळे आता आपण पाहिले आहे कि त्या त्या गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र हा इतरांप्रमाणे बॉलिवूडच्या बाबतीतही प्रसिद्ध आहे. कदाचित दोन नंबरचे काम या बॉलिवूड क्षेत्रात चालते. त्यातून बॉलीवूडला बदनाम करण्याचे आणि बॉलिवूडच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सध्या काही लोकांनी सुरु केलेले आहे, अशी टीकाही भाजपवर भुजबळ यांनी केली आहे.